महेन्द्रो मलयः सह्यो देवतात्मा हिमालयः ।
ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारावलिस्तथा ।।४।।
भारताच्या मध्यभागात गुजरातपासून बिहारपर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण पर्वतात नर्मदा व शोणभद्र नद्यांची उगमस्थाने आहेत. देशातील सात कुळपर्वतांपैकी विंध्याचल हा एक मानला जातो. असे मानले जाते की भारताला दक्षिण व उत्तर भागात विभाजित करणारा विंध्य पर्वत ओलांडून अगस्ती ऋषी दक्षिणेत गेले व त्यांनी उत्तर व दक्षिण भारतास एकसूत्रात गुंफण्याचे यशस्वी प्रयत्न केले.पुराणांनुसार हा पर्वत हिमालयाशी स्पर्धा करत मेरूपेक्षाही उंच होत होता. परंतु महर्षी अगस्ती या पर्वताकडे गेल्यानंतर आपल्या गुरूपुढे नतमस्तक होण्यासाठी हा पर्वत थोडा खाली आला. दक्षिणेतील प्रवास संपवून परत येईपर्यंत अशाच विनम्र अवस्थेत राहण्याचा महर्षींनी विंध्याचलास आदेश दिला. त्यानुसार तो त्यांची प्रतीक्षा करीत आहे. 'अमरकंटक' हे रमणीय तीर्थक्षेत्र याच पर्वतशृंखलेवर आहे.
No comments:
Post a Comment