गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।
पुराणांमध्ये उल्लेखित रेवा नदी नर्मदा या नावाने प्रसिद्ध आहे. विंध्य पर्वतातील अमरकंटक शिखरातून ही नदी उगम पावते व गुजरातमधील भडौच जवळ सिंधूसागरास जाऊन मिळते. पौराणिक मान्यतेनुसार रेवा नदी महादेवाच्या शरीरापासून उत्पन्न झालेली आहे. रेवा नदीच्या किनाऱ्यावर भेडाघाट, ओंकारेश्वर, मांधाता, शुक्लतीर्थ, कपिलधारा इ. तीर्थस्थाने आहेत. स्कंदपुराणातील रेवा खंडात या तीर्थस्थानांचे विस्तृत वर्णन आहे. पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकरांनी निर्मिलेली अनेक मंदिरे नर्मदेच्या किनाऱ्यावर आहेत.
No comments:
Post a Comment