भारत म्हणजे काय? देश, हवा, माती, पाणी, आभाळ, झाडं, माणसं... पण एवढं भिन्न खानपान, दिसणं, निसर्ग, भाषा असलेल्या या भूभागात पाश्चिमात्य राष्ट्रवाद ज्यात एक वंश, एक भाषा अश्या गोष्टी अपेक्षित आहेत तो येणार कसा... पण भारतात जी गोष्ट आहे ती म्हणजे एक सांस्कृतिक प्रवाह. असा प्रवाह जो सर्व भिन्नत्वाला सामावून घेत अखंड वाहत आहे.
जेव्हा भारत स्वतंत्र होत होता आणि सरदार पटेल सर्व संस्थानिकांना भेटत होते तेव्हा पहिल्याच सभेत त्यांनी सांगितले की 'भारतीयांपैकी काही जण (ब्रिटिश) प्रांतात तर काही जण संस्थानात राहतात. हा केवळ एक अपघात आहे. आपणा सर्वाची संस्कृती एकच आहे. आपण सर्व जण रक्ताने व हृदयाने एकसंध आहोत. ..तेव्हा आपणाला बंधुत्वाच्या व मित्रत्वाच्या नात्याने एकत्र बसून कायदे बनवायचे आहेत.. मातृभूमीवरील प्रेम व निष्ठेने प्रेरित होऊन आपल्याला एकत्र यावयाचे आहे.. आज आपण इतिहासाच्या निर्णायक ठिकाणी उभे आहोत.. एकत्र न येण्याच्या कारणाने पूर्वी आपण अनेकवेळा परकीयांचे गुलाम झालो होतो.. तेव्हा, बंधूंनो सहकार्य न करून.. ही सुवर्णसंधी वाया घालवून भावी पिढय़ांचा शाप घेऊ नका.' यात सरदारांनी भारतीय ही एक संस्कृती आपल्या सर्वांची आहे हे उद्धृत करून एकत्र येण्याबद्दल सांगितले. हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे.
पण या संस्कृती बद्दल, आपल्या पूर्वजांबद्दल, एका राज्यातील माणसाला दुसऱ्या राज्यातील महापुरुषांबद्दल किती माहीत असतं? महाराष्ट्रातील माणसाला लाचित बडफुकन माहीत नसतात, उत्तर भारतातील माणसाला तिरुवल्लूवर माहीत नसतात आणि दाक्षिणात्याला रणजीतसिंह माहीत नसतात. किमान ही नावं आणि त्यांची प्राथमिक माहिती असावी म्हणून संघात आम्ही "एकात्मता स्तोत्र" म्हणतो. शिबिराच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात या स्तोत्राने होते.
या एकात्मता स्तोत्रातील सगळ्या बाबींची थोडक्यात माहिती लातूर येथील प्राध्यापक डॉ रमेश जोशी यांनी एका छोट्या पुस्तिकेत दिली आहे. ती माहिती त्यांच्या पूर्वपरवानगीने या ब्लॉगवर देणार आहे.

No comments:
Post a Comment