Friday, June 14, 2019

यमुना

गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।

ही उत्तर भारतातील पवित्र नदी, हिमालयातील यामुनोत्री शिखरावरून निघून उत्तरप्रदेशातील प्रयागक्षेत्री गंगेस जाऊन मिळते. गंगा-यमुनेचे हे संगमस्थान 'तीर्थराज' मानले जाते. या नदीच्या किनाऱ्यावर इंद्रप्रस्थ (दिल्ली), मथुरा, वृंदावन सारखी ऐतिहासिक व धार्मिक नगरे वसलेली आहेत. नीलवर्णा यमुना नदीशी श्रीकृष्णाच्या जीवनाचा जवळचा संबंध आहे. कृष्ण भक्ती साहित्यात कृष्णाच्या यामुनेशी असलेल्या सहचर्यामुळे यमुनेचेही महात्म्य वर्णिलेले आहे. पुराणांमध्ये यमुनेला सुर्यकन्या म्हणून उल्लेखिले असून वेद आणि ब्राह्मणग्रंथातही यमुनेचा वारंवार उल्लेख आलेला आढळतो.

No comments:

Post a Comment

अमृतसर

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् । इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।। शीख पंथियांचे प्रमुख तीर्थस्थान असलेले हे पंजा...