अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।
भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी असलेली ही प्राचीन नगरी पश्चिमी उत्तर प्रदेशात यमुना किनारी वसलेली आहे. या नगरीचे प्राचीन नाव मधुरा होते, कालांतराने मथुरा झाले असावे. ध्रूवबाळाने नारदमुनींच्या उपदेशानुसार इथेच मधूबनात घोर तपश्चर्या करून भगवंताचे दर्शन प्राप्त केले होते. त्रेतायुगात प्रभू श्रीरामाच्या आज्ञेनुसार अत्याचारीलवणासुराचा वध करून शत्रुघ्नाने मथुरेचे राज्य सांभाळले होते. द्वापार युगात श्रीकृष्णांनी अत्याचारी कंसाचा वध करून आपल्या अवतारकार्याचा श्रीगणेशा इथेच केला होता. कलियुगात शकांनी आक्रमण करून मथुरा व अवंतिकेवर अधिकार प्राप्त केला होता. या शकांना नंतर सम्राट विक्रमादित्याने पराभूत केले. मुस्लिम शासनकळात क्रूरकर्मा औरंगजेबाने श्रीकृष्णजन्मभूमीवरील मंदिराचा विध्वंस करून तिथे एक मशीद बांधली. मथुरा-वृंदावनचा परिसर श्रीकृष्ण भक्तांसाठी सदैव अपरंपार श्रद्धेचे केंद्र राहिला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त करण्याचा करोडो कृष्णभक्तांचा ध्यास आहे, जो पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
No comments:
Post a Comment