अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।
पश्चिमी उत्तरप्रदेशात आणि आताच्या उत्तराखंडमध्ये गंगाकिनारी हे तीर्थक्षेत्र आहे. पर्वतांमधून निघून गंगा इथेच मैदानी प्रदेशात प्रवेश करते. हरिद्वारमध्ये प्रसिद्ध कुंभमेळा भरत असतो. त्यात लक्षावधी श्रद्धाळू भाग घेतात. ज्या वर्षी चंद्र-सूर्य हे मेष राशीत आणि गुरू कुंभ राशीत एकाच वेळी येतात तेव्हा कुंभाचा हा योग जुळून येतो. हरिद्वारमध्ये गंगाद्वार, कुशावर्त, बिल्वकेश्वर, नील पर्वत (नीलकंठ महादेव) आणि कनखल नावाची पाचप्रमुख तीर्थस्थाने आहेत. दक्षप्रजापतीने त्यांचा प्रसिध्द महायज्ञ कनखलमध्येच केला होता. या यज्ञाग्नीमध्ये सतीचे दहन होताच शिवगणांनी याचा विध्वंस केला होता.
No comments:
Post a Comment