गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।
कुर्ग प्रदेशातील सह्याद्रीच्या दक्षिण भागातून उगम पावून ही पवित्र नदी कर्नाटक आणि तामिळनाडू प्रांतातून प्रवाहित होत पूर्व समुद्रकिनाऱ्यावर गंगासगरात सामावते. या नदीच्या प्रवाहमार्गावर तीन ठिकाणी आदिरंगम्, शिवसमुद्रम् तसेच अंतरंगम् नावाचे तीन पवित्र द्वीप आहेत, जिथे विष्णुमंदिरे निर्मिलेली आहेत. उत्तर भारतात जे गंगेचे स्थान आहे तेच दक्षिण भारतात कावेरीचे आहे. कावेरीमधून निघणाऱ्या कालव्यांनी तामिळनाडू मधील शेती समृद्ध केली आहे.
No comments:
Post a Comment