गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।
वेदांमध्ये उल्लेखित पवित्र सरस्वती नदी आजच्या हरियाणा, राजस्थान व गुजरात प्रांतातून प्रवाहित होवून सिंधुसागरात विलीन झालेली होती. कालांतराने ही नदी लुप्त झाली (वैज्ञानिक दृष्ट्याही आता हे सिद्ध झालेले आहे). सरस्वतीचे किनारे हे ऋषी-मुनींची तपोभूमी राहिलेले आहेत. सरस्वतीच्या सभोवतालचा प्रदेश 'सारस्वत प्रदेश' म्हणून ओळखला जात असे, जो सांस्कृतिक संपन्नतेसाठी सुविख्यात होता. पुराणांमध्ये सरस्वतीला ब्रह्मदेवाची पत्नी तसेच ब्राह्मण ग्रंथांमध्ये वाणीची देवता म्हटले गेले आहे. या नदीच्या तटवर्ती प्रदेशातील विद्या-वैभव संपन्नतेमुळेही 'सरस्वती' हे नामाभिधान प्राप्त झालेले असणे शक्य आहे. आपल्या राष्ट्राचे, संस्कृतीचे विश्वातील सर्वाधिक प्राचीनत्व या नदीवरून सिद्ध होते.
No comments:
Post a Comment