Friday, June 14, 2019

गोदावरी

गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।

ब्रह्मपुराणानुसार गौतम ऋषींनी भगवान शंकराच्या जटेतून गंगेस सह्याद्री पर्वतातील ब्रह्मगिरीच्या (त्र्यंबकेश्वर) आश्रमाजवळ नेले. यामुळेच ब्रह्मगिरीतून प्रकट झालेल्या गोदावरीस गौतमी तसेच दक्षिणगंगाही म्हटले जाते. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीत उगम पावून गोदावरी महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्रप्रदेशातून जात गंगासागरास जावून मिळते. भगवान श्रीरामांनी गोदावरीकाठी नाशिक येथील पंचवटीमध्ये निवास केला होता. समर्थ रामदास स्वामींनी हिच्याच तीरावर १३ वर्ष घोर तपश्चर्या केली. गोदाकाठीच नांदेड येथे श्री गुरू गोविंदसिंहांची समाधी आहे. गोदावरीच्या किनाऱ्यांवरच नाशिक, पैठण, कोठीपल्ली, राजमहेंद्री, भद्राचलम् इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. ब्रह्मपुराणामध्ये गोदातटावर सुमारे शंभर तीर्थस्थानांचे वर्णन आहे. या तीर्थस्थानावरील अनेक मंदिरांचा मुस्लिम आक्रमकांनी विध्वंस केला. परंतु मराठा राजवटीच्या उत्कर्षकाळात अनेक मंदिरांचे पुनर्निर्माण झाले. गोदा किनाऱ्यावरील नाशिक येथील पंचवटीतील काळाराम मंदिर हे दक्षिण पश्चिम भारतातील सर्वोत्तम मंदिरांमध्ये गणले जाते. याच मंदिरामध्ये उपेक्षित बांधवांना प्रवेश देवून शेष हिंदू समाजाशी समरस होण्यासाठी भारतरत्न डॉ आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता.

No comments:

Post a Comment

अमृतसर

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् । इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।। शीख पंथियांचे प्रमुख तीर्थस्थान असलेले हे पंजा...