महेन्द्रो मलयः सह्यो देवतात्मा हिमालयः ।
ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारावलिस्तथा ।।४।।
राजस्थानचा हा प्रमुख पर्वत. उत्तर पश्चिम दिशेकडून होणाऱ्या आक्रमणांना याच पर्वताने रोखले. महाराणा प्रतापांचे शौर्य व पराक्रमाचा साक्षीदार आणि प्रतापांची कर्मभूमी हाच पर्वत आहे.सुप्रसिद्ध हल्दीघाटी या पर्वताच्याच रांगावर स्थित आहे. अरावलीच्या सर्वोच्च शिखराचे नाव आबू (आर्बुदाचल) आहे. याचं शिखरावर जैन संप्रदायाचे पवित्र तीर्थस्थान आहे. या पर्वताचे प्राचीन संस्कृत नाव 'परिमात्र' होते. याची गणना प्रमुख सात कुळपर्वतांमध्ये होत होती.
सात कुळपर्वतांची नावे पुढील श्लोकात आढळतात.
महेन्द्रो मलय सह्यो शुक्तिमान् ऋक्षवानपि ।
विन्ध्यश्च परिमात्रश्च सप्तैते कुलपर्वताः ।।

No comments:
Post a Comment