Friday, June 14, 2019

ब्रह्मपुत्र

गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।

हिमालयातील पवित्र मानसरोवराजवळच ब्रह्मपुत्राचे उगमस्थान आहे. हा महानद पूर्वेकडे प्रवाहित होत आसाम आणि बंगालमधून जात गंगासागरात विलीन झालेला आहे. भारतातील नद्यांमध्ये ब्रह्मपुत्रेची लांबी सर्वाधिक आहे. खूप दूरपर्यंत तिबेटमध्ये 'सांपो' नावाने संबोधली गेलेली ही महानदी अरुणाचल प्रदेशच्या उत्तर सीमेवरून भारतात प्रवेश करते. गौहत्ती (गुवाहाटी) मध्ये ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावर एका पर्वतशिखरावर कामाख्या देवीचे पवित्र शक्तीपीठ आहे. अपुनर्भव, भस्मकूट आणि कर्णेश्वर इ. अनेक तीर्थक्षेत्र ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावर आहेत.

No comments:

Post a Comment

अमृतसर

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् । इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।। शीख पंथियांचे प्रमुख तीर्थस्थान असलेले हे पंजा...