गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।
या पवित्र नदीचा वैदिक साहित्यात उल्लेख आहे. हिमालयातील कैलास पर्वतशिखरापासून जवळच असलेल्या मानसरोवरापासून उगम पावून ही नदी काश्मीर, पंजाब, सिंध प्रांतांतून प्रवाहित होत सिंधू सागरास जाऊन मिळते. सिंधू नदी ही वेदांमधील उल्लेखित नदी असून, हिच्या किनाऱ्यावर वैदिक संस्कृतीचा विकास झाला. 'हिंदू' शब्द सिंधूपासूनच बनला असल्याचीही मान्यता आहे. सिंधू आणि तिच्या सहाय्यक नद्यांसहित सात नद्यांचा प्रदेश 'सप्तसैंधव' म्हणून ओळखला जात असे. वैदिक सभ्यता-संस्कृती इथे फुलली-फळली. परंतु आज या नदीचा फार थोडा भाग भारतात असून बहुतांश दुर्दैवाने पाकिस्तानात आहे.
No comments:
Post a Comment