प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।
आज बिहारमध्ये असलेली बिहारची राजधानी म्हणजे प्राचीन पाटलीपुत्र नगरी होय. अनेक साम्राज्ये व राजवंशांची ही राजधानी राहिलेली ही नगरी, आज पटना म्हणून ओळखली जाते. प्राचीन काळात या नगरीस पाटलीपुत्र, कुसुमपूर, पुष्पपूर अथवा कुसुमध्वज या नावांनी ओळखले जात होते. गंगा आणि शोणभद्र नदीच्या संगमावर हे नगर वसले आहे. इसवीसनापूर्वी शेकडो वर्षे भगवान बुद्धांचे अनुयायी अजातशत्रू नावाच्या राजाने ही नगरी वसविली.स्वतः महात्मा बुद्धांनी या नगरीच्या परमोत्कर्षाविषयी भविष्यवाणी केली होती. ही नगरी दीर्घकाळपर्यंत मगध राज्याची राजधानी राहिली. या नगरीने नंद, मौर्य, शुंग आणि गुप्त वंशाच्या महान साम्राज्यांचे निर्मिती, उत्थान व पतन पाहिले आहे. शीख पंथाचे दहावे गुरूगोविंदसिंगजींचा जन्म याच नगरीत झाला. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसादांची ही कर्मभूमी राहिलेली आहे.
No comments:
Post a Comment