प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।
कलि युगाब्द ४४३७ (इ. स. १३३६) मध्ये पू. विद्यारण्यस्वामी (माधवाचार्य) यांच्या मार्गदर्शनाने हरिहर व बुक्कराय या वीरबंधूंनी विजयनगरच्या साम्राज्याच्या या राजधानी नगरीची निर्मिती केली. आपले गुरू विद्यारण्यस्वामींच्या नावावरून या नगरीस विद्यानगर हे नाव दिले गेले, कालांतराने विजयनगर म्हणून प्रस्थापित झाले. ही ऐतिहासिक नगरी तुंगभद्रा नदीकिनारी वसली होती. वेदमूलक हिंदूधर्म व संस्कृतीची सुरक्षा आणि संवर्धनाचे या साम्राज्याचे उद्दिष्ट होते. हिंदू साम्राज्य संस्थापक संगमवंशीयांनंतर सलुववंश, तुलुववंशीय पराक्रमी राजवंशांचे इथे अधिपत्य राहिले. तुलुववंशीय राजा कृष्णदेवरायांनी विजयनगर साम्राज्याचा उत्कर्ष केला आणि आक्रमक मुसलमानांनी उध्वस्त केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धारही केला. विजयनगरचे हिंदू साम्राज्य युगाब्द ४४३७ ते ४६६६ (इ. स. १३३६ ते १५६५) पर्यंत उत्कर्ष पावलेले होते. या साम्राज्याचे विदेशांशी व्यवहार संबंध होते.

No comments:
Post a Comment