प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।
महाभारतात उल्लेखिलेले, पांडवांनी वसविलेले हे नगर आत्ताच्या दिल्लीजवळ होते. असे मानले जाते की पूर्वी इथे खांडव नावाचे घनदाट अरण्य होते. ते जंगल तोडून नगर वसविले होते. दुर्योधनाच्या कपटनीतीनुसार त्यास हस्तिनापूर स्वतःस हवे असल्याने कुरुवंशीय राज्याचे विभाजन करून हा जंगली प्रदेश पांडवांना देण्यात आला होता. मय नावाच्या दानवाच्या अद्भुत स्थापत्यकलेमुळे कल्पनातीत इंद्रप्रस्थ निर्मिले गेले. युधिष्ठिराने येथेच राजसूय यज्ञ केला होता. इंद्रप्रस्थ नगरीने इतिहासात अनेक उत्थान-पतन पाहिले
No comments:
Post a Comment