अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।
प्राचीन काळातील वज्जीसंघ व लिच्छवी गणाराज्यांची आता बिहारमध्ये असलेली प्रसिद्ध प्राचीन नगरी वैशाली एकेकाळी भव्यता व वैभवसंपन्नतेसाठी देशात सुप्रसिद्ध होती. चोविसावे जैन तीर्थंकर भगवान महावीरांचा जन्म इथेच झाला. यामुळे जैन पंथाचे हे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र व श्रध्दाकेंद्र आहे. भगवान बुद्धांच्या काळात भारतातील प्रमुख सहा नगरींपैकी वैशाली एक होती. भगवान बुद्धांचे वास्तव्य इथे दीर्घकाळ राहिले. इक्ष्वाकू वंशातील विशाल राजाच्या नावावरून या नगरीचे वैशाली हे नामकरण झाल्याचे मानले जाते. भगवान श्रीरामांनी मिथिलेस जतेवेळी या नगरीचे अवलोकन केले होते.
No comments:
Post a Comment